पंढरपूर : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद

31 Oct 2023 13:42:55


Bus

सोलापूर :
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाने ठिकठिकाणी जाळपोळ करत हिंसक रुप धारण केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर बसस्थानकानवर शुकशुकाट पसरलेला आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा आंदोलनाने ३० ऑक्टोबर रोजी उग्र रुप धारण केले. आंदोलकांकडून मराठवाड्यातील अनेक भागांत जाळपोळ, हल्ले करण्यात आले. एवढेच नाही तर बसवर दगडफेक केली गेली. तसेच अनेक ठिकाणी आंदोलकांनी बस पेटवून दिल्या.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर पंढरपुरमध्ये सध्या बससेवा बंद करण्यात आली आहे. येथील सर्व बसेस आगारामध्ये उभ्या आहेत. मंगळवारी सकाळपासून संपुर्ण बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय आगारप्रमुखांनी घेतला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या बसस्थानकावर सध्या शुकशुकाट पसरलेला आहे.


Powered By Sangraha 9.0