जय श्रीराम! स्विडनमध्येही पार पडला रावण दहनाचा कार्यक्रम, पाहा व्हिडिओ!

31 Oct 2023 15:57:35
Ravan Dahan in Sweden Video

नवी दिल्ली
: दसरा हा सण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचपद्धतीने परदेशात स्विडन (युरोप) येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता स्विडनमधील रावण दहनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ४० सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमधील एक नागरिक दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळ्याला बाण मारताना दिसत आहे. स्विडनमधील या दसरा उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. व्हिडिओमध्ये लोक 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देतानाही ऐकू येत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.






Powered By Sangraha 9.0