पंतप्रधान मोदी गुजरातमधील ५९५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार

31 Oct 2023 14:10:00
Modi
 
पंतप्रधान मोदी गुजरातमधील ५९५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाचा गुजरात दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातमधील विविध विकासकामांचे उद्घाटन व आढावा घेण्यासाठी हा दोन दिवसीय दौरा असल्याचे गुजरात सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सुमारे ५९५० कोटींची ही विकासकामे असून मोदी अंबाजी मंदिराचे दर्शन घेणार आहेत. बसकाठा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वरूण बनरवाल देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मेहसाणा, अहमदाबाद येथील रेल्वे प्रकल्पांची पाहणी पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रकल्पाचे देखील अनावरण करणार आहेत. या प्रकल्पामुळे मंडल बेचारजी स्पेशल इनव्हेसमेंट झोनमधील असलेल्या कंपनी व उद्योगजकांना या कनेक्टिव्हिटीचा लाभ होईल.
 
साबरमती नदीवरील धरण, महिसर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, चारपदरी रस्ते अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. ३१ ऑक्टोबरला नॅशनल युनिटी डे साजरा करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त यांनी पंतप्रधान आदरांजली वाहतील.
 
पंतप्रधान आरंभ ५.० इथे कॉमन फाऊंडेशन कोर्सचे अनावरण देखील करतील.अशा विविध उद्देशीय कारणांसाठी पीएम मोदी अनेक प्रकल्पाचे उद्घाटन करतील असे सांगण्यात आले आहे. हा दोन दिवसीय दौरा ३० ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0