देशातील उभरत्या क्षेत्रांना ग्लोबल उत्पादन हब बनवण्यासाठी निती आयोगाची नवी रणनीती

31 Oct 2023 13:06:40

Niti Ayog
 
 
देशातील उभरत्या क्षेत्रांना ग्लोबल उत्पादन हब बनवण्यासाठी निती आयोगाची नवी रणनीती
 
मुंबई: भारतातील आर्थिक व विकासात्मक धोरणे ठरवणारी संस्था नीती आयोग म्हणून ओळखली जाते. यातच निती आयोगाने एक नवीन निर्णय घेतला आहे. भारतातील उभरत्या नव्या क्षेत्रांचा उलगडा नीती आयोग करणार आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करणाऱ्या भारतातील या क्षेत्राला ' ग्लोबल मॅन्युफॅकचरिंग हब ' बनवण्याचे निती आयोगाने ठरवले आहे. या महत्वाच्या सेक्टरवर लक्ष केंद्रित करत त्यानुसार प्रगतीसाठी सकारात्मक रणनीती व धोरणे आखण्याचे नीती आयोगाने ठरवले आहे.
 
अशा उद्योगांना मुलभूत पायाभूत सुविधा देऊन उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.आपले उत्पादन वाढवून जागतिक पातळीवरील मागणीनुसार उत्पादन करण्याचे लक्ष या उद्योग व्यवसायिकांना दिले जाईल. याबद्दल नीती आयोग ४ महिने अभ्यास करून आपली रणनीती ठरवणार आहे. विशेषतः सिमेंट, स्टील, एफएमसीजी अशा क्षेत्रांना प्रोत्साहन दिले जाईल. पीएलआय ( Production Linked Incentives) चे लाभार्थी नसलेल्या कंपन्यांना हे मार्गदर्शन केले जाणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0