धाराशीवमध्ये टायर जाळत मराठा आंदोलक आक्रमक

31 Oct 2023 16:09:00
Maratha Reservation movement in Dharashiv

मुंबई :
धाराशीवमध्ये टायर जाळत रास्ता रोको करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यातील विविध तालुक्यांत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्ग अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत धाराशीव येथे टायर जाळत आंदोलन सुरु ठेवले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरावरदेखील हल्ले करण्यात आले होते. आ. सोळंके यांच्या घरावर जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी गंभीर दखल घेत गृहमंत्र्यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Powered By Sangraha 9.0