सोलापूर : मराठा आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली असतानाच आता राज्यातील विविध भागात त्याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. त्यातच आता मराठा आंदोलकानी नगर-सोलापूर रस्ता अडविला. त्यानंतर पोलीसांनी सदर वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, काही मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देताना पाहायला मिळत आहे. याआधी पुण्यात नवले पुलाशेजारी टायर जाळून मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते.
दरम्यान, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेता राज्य सरकारकडून यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषददेखील घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात सुतोवाच केले होते.