मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राबाबत काय निर्णय घेतला? आजपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र दिलं जाणार? यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
बीड आणि धारशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडमध्ये आजपासून एसआरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला. बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
याच पार्श्वभुमीवर विशेष अधिवेशनासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तर, आज (३१ ऑक्टो.) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेणार आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना झाले आहे. ते मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत.