नवी दिल्ली : केरळमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटातील आरोपी डॉमिनिक मार्टीनवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि स्फोटक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
केरळमध्ये रविवारी झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 जण जखमी झाले. स्फोटानंतर त्याची जबाबदारी घेऊन डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने पोलिसांना आत्मसमर्पण केले. स्फोटानंतर काही तासांनी तो स्वत: पोलिसात आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचला. केरळ पोलिसांनी सांगितले की, रविवारच्या स्फोटाप्रकरणी डॉमिनिक मार्टिनला अटक करण्यात आली आहे.
केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मार्टिनवर युएपीए, स्फोटक कायदा, कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार या स्फोटात त्याचाच सहभाग असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या विधानाच्या उलट आणखी काही लोक गुंतले आहेत का याचा तपास तपास यंत्रणा करत आहेत, असेही केरळ पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.