राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय पेटवलं; आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यात जाळपोळ

30 Oct 2023 18:56:47
 
NCP Bhawan
 
 
मुंबई : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवल्याची घटना समोर आली आहे. तर, बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
 
मराठा आरक्षणासाठी बीड तालुक्यातील वडवणी शहर आणि तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे तर मराठा आंदोलकांनी वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बीड परळी रोडवर आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवून दिले आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0