वेदांता २०२४ मध्ये सगळी देणी चुकवेल - अनिल अग्रवाल

03 Oct 2023 15:17:19
 
Anil Agrawal
 
 
वेदांता २०२४ मध्ये सगळी देणी चुकवेल - अनिल अग्रवाल
 
 
नवी दिल्ली: नैसर्गिक ऊर्जा संसाधने व तंत्रज्ञान कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेदांतांचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सीएनबीसी १८ शी बोलतांना ' कंपनी २०२४ पर्यंत आपली सगळी देणी चुकवेल' असे विधान केले आहे. वेदांतांचे मुख्य कार्यालय इंग्लंड येथे असून वित्तीय तरतूद झाली असून थकबाकी २०२४ पर्यंत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये १ बिलियन हून अधिक रक्कम कंपनीला देय आहे. याच धर्तीवर अनिल अग्रवाल यांनी स्टीलची विक्री करून प्रश्न निकाली काढण्यात असल्याचे सांगितले आहे.
 
 
अग्रवाल यांच्या याच विधानानंतर वेदांतांच्या शेअर्सवर यांचा परिणाम होऊन शेअर किंमतीत वाढ झाली. कंपनीचा डिमर्जची योजना काही दिवसांपूर्वी आखलेली असल्याने सहा व्यवसायांची स्वतंत्र सबसिडरी कंपनी होऊ शकते. आर्थिक विश्लेषकांनी २०२५ पर्यंत ४ बिलियनची परतफेड कशी करणार यावर चिंता व्यक्त केली आहे. परंतु कंपनीने सगळे देय चुकवून आपला सकारात्मक संदेश शेअरहोल्डर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
 
Powered By Sangraha 9.0