SSC Recruitment 2023 : "या" पदासाठी मोठी भरती; आजच अर्ज करा

03 Oct 2023 17:50:18
Staff Selection Commission Recruitment 2023

मुंबई :
'स्टाफ सिलेक्शन कमिशन' अंतर्गत विविध पदांसाठी केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एसएससीद्वारे 'स्टेनोग्राफर' या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदाच्या रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 'स्टेनोग्राफर' ग्रेड 'सी' पदाकरिता २९७ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २१ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.

भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0