...म्हणून ठाण्याची पुनरावृत्ती नांदेडमध्ये झाली: शरद पवार

03 Oct 2023 12:12:40

Sharad Pawar 
 
 
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत पवारांनी ठाण्यातील घटनेची आठवण करुन दिली आहे.
 
 
शरद पवार म्हणाले, "नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली....!"
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0