ह्रतिक रोशन चित्रपटात पुन्हा ॲक्शन करताना दिसणार

03 Oct 2023 11:56:04
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील चिरतरुण अभिनेता अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन विक्रम वेधा चित्रपटानंतर आता नव्या रुपात पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आतापर्यंत क्रिश, वॉर यांसारख्या अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मन जिंकलेला ह्रतिक त्याच्या आगामी ‘फायटर’चित्रपटातही अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक एअरफोर्सच्या फायटरची भूमितका साकारणार असून  एका फोटोमध्ये हृतिक फायटर प्लेनला हात लावून उभे राहिल्याचे दिसत आहे. 
 
हृतिकचा बहुचर्चित 'फायटर' चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘फायटर’ देशभक्तीपर चित्रपट असून याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यापूर्वी त्यांनी हृतिकच्या ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच, या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादूकोण देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 
Powered By Sangraha 9.0