नांदेड शासकीय रुग्णालय प्रकरण: चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार: मुख्यमंत्री शिंदे

03 Oct 2023 15:56:25
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर, चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "मंत्रीमंडळ बैठकीत नांदेड रुग्णालयातील घटनेवर चर्चा झाली. प्राथमिक माहिती घेतली असता, रुग्णालयात १२७ प्रकारची औषधं उपलब्ध होती. औषधांची कमतरता नव्हती. याउलट १२ कोटींची मान्यता औषधांकरिता दिली. झालेल्या मृत्युंची चौकशी होईल. चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होईल. परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभिर्याने घेतलेली आहे. मृतांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हृदयाचा त्रास होता. एक अपघात होता. त्यात काही नवं बालकं होती. ती प्री-टर्म होती. वजनाने कमी होती." चौकशी अंती जो अहवाल येईल, त्यावर आम्ही पुढील कारवाई करु. सरकार या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0