‘काझिंद-२०२३' अंतर्गत भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव

29 Oct 2023 17:38:57
Kazind 2023 India Kazakhstan Joint Military Exercise

नवी दिल्ली :
भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव ‘काझिंद-२०२३' च्या ७व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या १२० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तुकडी कझाकस्तानला रवाना झाली. हा संयुक्त लष्करी सराव कझाकस्तानातील ओटार येथे ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, या लष्करी सरावात डोगरा रेजिमेंटच्या एका बटालियनच्या नेतृत्वाखालील ९० सैनिकांचा समावेश असून कझाकिस्तानच्या तुकडीमध्ये प्रामुख्याने कझाक ग्राउंड फोर्सेसच्या दक्षिणेकडील प्रादेशिक कमांडच्या सैनिकांचा समावेश आहे. या सरावात लष्कराच्या तुकड्यांसोबत दोन्ही देशांच्या हवाई दलाचे ३० सैनिकही सहभागी होतील.

तसेच, दोन्ही देशांना युद्ध कौशल्याच्या विस्तृत कक्षेत दोन्ही दलांना विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि सर्वोत्तम पद्धती सामाईक करण्याची संधी देईल. तसेच, ‘काझिंद-२०२३’ या सरावामुळे दोन्ही सैन्यांमधील बंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.
Powered By Sangraha 9.0