नवान्न पौर्णिमा का साजरी करतात?

    28-Oct-2023
Total Views |

navanna pornima 
 
मुंबई : कित्येकांनी नवान्न पौर्णिमा हा शब्दप्रयोगच ऐकला नसल्याच्या शक्यता जास्त आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शेती ज्यांचा प्रमुख व्यवसाय आहे, अशा घरात नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्याकडे बरेच सण पौर्णिमेच्या दिवशी साजरे होतात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? यामागचं कारण काय असावं?
 
पूर्वी विजेचा वापर अतिशय कमी किंवा फारसा नव्हताच, तेव्हा दिवे किंवा कंदील यांच्या उजेडात सर्व कामे करावी लागत. मग त्यासाठी संपूर्ण दिवस सूर्याचा मुबलक प्रकाश असताना तो का वापरला जात नाही? तर अत्यंत व्यस्त दैनंदिन जीवनातून सण समारंभासाठी एक संपूर्ण दिवस घालवणे कठीण असायचे. तेव्हा रात्री पौर्णिमा असेल त्या दिवशी चंद्राचा प्रकाश मुबलक असतो.
नवान्न पौर्णिमा म्हणजे काय?
 
नवान्न म्हणजे नवीन अन्न. नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या दिवशी सर्व धान्य घरात आलेलं असतं, दिवाळीपूर्वी आठ दिवस राठोड साजरा कजरतात तेव्हा झोडपलेलं धान्य कणगीतर भरून ठेवलं जातं. आजच्या दिवशी नव्या तांदुळाची खीर नैवेद्य म्हणून करण्याचा प्रघात कोकणात आहे. दाराला नव्या कणिसाच्या लोम्ब्या लावून आंब्याच्या पानाचं तोरण घराघरात बांधलं जातं. प्रत्येक दाराला एक एक कणीस बांधलं जातं. शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा हा सण.