सोलापूरमधला ड्रग्स कारखाना उद्धवस्त!

28 Oct 2023 11:41:01

Solapur Drugs Factory
 
 
 
सोलापूर : नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाचे सोलापूर कनेक्शन उघडकीस आले आहे. मुंबई, पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई करत असताना आता नाशिक पोलिसांनी मुंबई आणि सोलापूरमध्ये कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांनी सोलापुरातील ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला असून सुमारे १० कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकमध्ये सोलापूरमधून ड्रग्ज येत असल्याचं तपासात समजते आहे.
 

Solapur Drugs Factory 
 
नाशिकच्या वडाळा गावातील ड्रग्ज रॅकेटचा तपास करताना मुंब्र्यातून दुसऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर असे या संशयिताचं नाव आहे. चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. मुबंईतील रॅकेटची साखळी शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि क्राईम ब्रँचच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0