...तर कोतवाल भरती परीक्षा रद्द; जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांचा इशारा

28 Oct 2023 17:19:58
Kotwal Recruitment Exam Copy Case

महाराष्ट्र :
कोतवाल भरती परीक्षेत झालेल्या कॉपी प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जालना येथील कोतवाल भरती परीक्षेदरम्यान आणखी अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे. परंतु, याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात कोतवाल भरतीच्या परीक्षेवेळी काही उमेदवारांकडून गैरप्रकार करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. पण, या प्रकरणी संबंधित ७ ते ८ उमेदवारांची नावे समोर आली असतानाही त्यांना पोलीसांनी अजूनही अटक केली नसल्याने यावर संतप्त होत जर या संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही तर कोतवाल भरती परीक्षा रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0