सरकारने पारंपारिक तसेच उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली - पंतप्रधान मोदी

28 Oct 2023 16:33:55

Modi
 
सरकारने पारंपारिक तसेच उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली - पंतप्रधान मोदी
 
मुंबई: सरकारने पारंपारिक तसेच रिन्यूएबल एनर्जी, डिफेन्स,ऑटोमेशन अश्या उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५१००० तरूणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हे उद्गार काढले.
 
'ऑक्टोबरपासून सरकार व भाजपशासित राज्यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. लाखो विद्यार्थ्यांना रोजगाराचे नियुक्ती पत्र आतापर्यंत देण्यात आले आहे. यातून आमच्या शासनाची तरूणांबाबत असणारी प्रतिबद्धता दिसून येते.' असे नरेंद्र मोदी व्हरचुअल इव्हेंटमध्ये बोलताना असे म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0