बीएसएनएल डिसेंबरमध्ये देशभरात ४ जी सेवा सुरू करणार

28 Oct 2023 16:16:37

BSNL
 
 
 
 
 
बीएसएनएल डिसेंबरमध्ये देशभरात ४ जी सेवा सुरू करणार
 

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी ४ जी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून नंतर व्यापक स्वरूपात सेवा ग्राहकांना देणार असल्याचे बीएसएनएलने संचालक पी के पुरवर यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीचा ४ जी वरून ५ जी सेवेत परिवर्तित करण्याचा मानस आहे.
 
' पंजाबमध्ये ४ जी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होईल. आधीच नेटवर्क करता २०० साईट्स वर काम केले गेले आहे. आता पंजाबमध्ये ३००० साईटवर काम सुरू आहे. टप्याटप्याने बीएसएनएल ६०००,९००० व ,१५००० साईट्सपर्यंत संख्या वाढवणार आहे ‌जुन २४ पर्यंत ४ जी, व जून २४ नंतर ५ जी सेवा सुरु करणार आहे.' असे पूरवर यांनी यावेळी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0