भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) चे नफा कमवून पुनरागमन
नवी दिल्ली: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( बीपीसीएल) ने सप्टेंबरमध्ये पुनरागमन केले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीला नफ्यात वाढ झाली आहे. जुलै सप्टेंबरमध्ये एकत्रित नफा ८२४३.५५ कोटींचा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ३३८.४९ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. बीपीसीएलचे करापूर्वीचे उत्पन्न ११२८.२९ कोटींवर आले आहे. मागील आर्थिक वर्षात याचवेळी कंपनीला १२३.१७ कोटींचा तोटा झाला होता.
जागतिक संकटाच्या व युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील बीपीसीएल, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियमने इंधनदरात वाढ केली नव्हती. ग्राहकांना यावेळी अस्थिरतेचा फटका बसू नये यासाठी ही तरतूद त्यावेळी कंपनीने केली होती.यामुळे आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये कंपनीला नुकसान सहन करावे लागले. यंदा मात्र विक्रीमध्ये ६.५६ टक्यांने वाढ झाली आहे. २२-२३ च्या ११.४४ लाख टनच्या तुलनेत यावेळी आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १२.१९ टन विक्री झाली.
मागील वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात १.१६ लाख कोटींनी उत्पन्न घटले होते. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर मार्केटिंगच्या जोरावर बीपीसीएलने नफा कमवत वापसी केली आहे.