'टॉस'वेळी स्पायडर कॅम तंत्रज्ञान वापरा; पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजचा आयसीसीला सल्ला

27 Oct 2023 17:50:30
mohammad-hafeez-requests-icc-to-show-toss-result-using-spider-cam

मुंबई :
सामना सुरू होण्याआधी नाणेफेकवेळी स्पायडर-कॅम तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अशी मागणी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज याने केली आहे. तो म्हणाला, सामन्याला सुरूवात होण्याअगोदर टॉस झाल्यानंतर तो दाखविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, असा सल्लाच हाफिजने आयसीसीला यावेळी दिला.

दरम्यान, नाणेफेक करताना नाणे उंच फेकताच ते ५ ते १० मीटर दूर अंतरावर पडते, त्यामुळे जर स्पायडर-कॅमचा वापर केल्यास क्रिकेटपटू, चाहते आणि सर्वांनाच नाणेफेक कुणी जिंकली हे दिसेल, असे मोहम्मद हाफिजने सांगितले. यंदाच्या आयसीसी विश्वचषक २०२३ दरम्यान, नाणेफेकीने सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले.

Powered By Sangraha 9.0