जग आता मेड इन इंडिया फोन वापरते - नरेंद्र मोदी

27 Oct 2023 13:24:19

Modi
 
 जग आता मेड इन इंडिया फोन वापरते - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील वर्ल्ड मोबाईल काँग्रेस मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हे उभारते उत्पादन निर्मिती केंद्र असल्याचे अधोरेखित केले. जग आता ' मेड इन इंडिया ' फोन वापरत असल्याचे याप्रसंगी त्यांनी गौरवोद्गार काढले. नरेंद्र मोदी यांनी एनडीए प्रणित भाजप सरकारने ९ वर्षात भारताला उत्पादनाचा आयातदार पासून आता निर्यातदार बनवल्याचे सांगितले आहे.
 
'भारताने गुगल पिक्सेल फोन भारतात बनवणार असल्याचे जाहीर केले होते. आता सॅमसंग,अँपल या कंपन्यांनीदेखील भारतात मोबाईल उत्पादन सुरू केले आहे. यापुढे भारत ६ जी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेईल. नजीकच्या काळात भारत तंत्रज्ञानात अग्रणी असेल ' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना उद्देशून सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0