शेअर मार्केट अपडेट्स: मोठ्या प्रतिक्षेनंतर सेन्सेक्स निफ्टीमध्ये १ टक्यांने वाढ अखेर मार्केटमध्ये तेजी परतून सकारात्मकता

27 Oct 2023 17:42:48
Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: मोठ्या प्रतिक्षेनंतर सेन्सेक्स निफ्टीमध्ये १ टक्यांने वाढ अखेर मार्केटमध्ये तेजी परतून सकारात्मकता
 

मुंबई : बीएसी ३० सेन्सेक्समध्ये ६३४. ६५ अंकाने वाढ होत सेन्सेक्स ६३,७३२.८० गुणांपर्यंत वाढला‌. दुसरीकडे निफ्टीमध्ये २०२.४५ अंकाने वाढ होत १९०५९.७० गुणांपर्यंत वाढले आहे. विशेषतः ऑटो, फायनान्शिअल, एनर्जी शेअर्स मध्ये रिकवरी पहायला मिळाली.
 
निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि निफ्टी आयटी मध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये तेजी आल्याने निफ्टी पीएसयू बँक ४ टक्क्यांहून अधिक वधारली.
 
निफ्टी 50 मध्ये कोल इंडिया, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि बजाज ऑटो यांचे समभाग वधारले. यूपीएल, आयटीसी, हिंडाल्को, बीपीसीएल आणि एशियन पेंट्स चे समभाग घसरले. क्लोजिंग बेलनंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सुझलान एनर्जी, जेपी पावर हे शेअर्स तेजीत दिसले. व डॉ रेड्डी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयटीसी, एशियन पेंटस हे शेअर्स लूजर ठरले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0