मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आफ्रिदी हिंदू परंपरांचा अपमान करताना दिसत आहे. आफ्रिदी हिंदू धर्माचा अपमान करत असताना तिथे उपस्थित लोक त्याच्या बोलण्यावर टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी एका चॅट शोमध्ये महिला होस्टच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. महिला होस्ट त्याला विचारते की त्याने कधी टीव्ही तोडला आहे का? ज्याला तो 'हो' असे उत्तर देतो आणि पुढे म्हणतो की त्याने हे आपल्या पत्नीमुळे केले. टीव्ही तोडण्याच्या घटनेचे वर्णन करताना आफ्रिदी म्हणतो की, "पूर्वी माझी पत्नी स्टार प्लसची मालिका खूप पाहत असे, त्यामुळे तो आपल्या पत्नीला सांगायचा की, जर तिला हे सर्व बघायचे असेल तर तिने एकट्याने बघावे. मुलांसमोर भारतीय मालिका पाहू नये"
आफ्रिदी पुढे सांगतो की एकदा तो त्याच्या घरी आला तेव्हा अक्ष किंवा अंशा (त्याच्या मुली) टीव्हीसमोर हात फिरवत काहीतरी करत होत्या आणि स्टार प्लस टीव्हीवर एक गीत वाजत होते. आपल्या मुलीला 'हिंदू परंपरा' पाळताना पाहून मला इतका राग आला की मी कोपर मारून घरातील टीव्ही तोडला."
आफ्रिदी ज्या हिंदू परंपरेचा उल्लेख करत आहे, ती देवाची आरती आहे. आफ्रिदी कोणत्याही विचाराविना हिंदू धर्माच्या धार्मीक परंपरेचा अपमान करताना दिसत आहे. आफ्रिदी हिंदू धर्माचा अपमान करत असताना कार्यक्रमाची होस्ट आणि तिथे बसलेले पाकिस्तानी प्रेक्षक टाळ्या वाजवतात.
काही दिवसांपूर्वीच दानिश कनेरिया हा पाकिस्तानी हिंदू खेळाडूंनी आपल्या संघातील खेळाडूंवर धार्मिक आधारावर भेदभाव करत होते, असा आरोप केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी शोएब अख्तरने हिंदू खेळाडूंविषयी भेदभाव केल्याचा आरोप स्वीकारला होता.