सलग तीन पराभवानंतर बाबरसेनेकडून चाहत्यांना विनवणी; वाचा काय म्हणाले क्रिकेट बोर्ड

27 Oct 2023 15:43:38
Pakiastan Cricket Board Appealed Fance

मुंबई :
विश्चचषकातील सलग तीन पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आता बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे. कर्णधार बाबर आझमदेखील संघाच्या कामगिरीबाबत चिंतेत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पाकिस्तान संघाला दुबळ्या संघांकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खडबडून जागे झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करत संघाला पांठिंबा देण्याची विनवणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेटविश्व आणि चाहत्यांनी पाक संघाला पाठिंबा देणे सुरू ठेवावे अशी विनंती करण्याची नामुष्की पाक क्रिकेट बोर्डावर ओढावली आहे.

तसेच, पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तान बोर्डाने चाहत्यांना विनंती करतानाच यश आणि अपयश हा खेळाचा भाग असून पुढील सामन्यात आम्ही विजय मिळविणार असा विश्वासही व्यक्त करत आहे. त्यामुळे विश्वचषकातील उपांत्य फेरीतील वाट बिकट होत असताना बाबरसेनेकडून अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Powered By Sangraha 9.0