"मोदी आणि योगींमुळे हिंदूंना हा भाग्याचा दिवस पाहता आला" - कंगना रणौत

27 Oct 2023 17:30:48
AYODHYA 
 
लखनऊ : अभिनेत्री कंगना रणौत यांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर २०२३) रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी रामललाच्या मंदिराचे बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांशी मुलाखत केली. त्यावेळी त्या म्हणाला की, "'तुम्ही सर्व आमच्यासाठी हनुमानजीची सेना आहात, जी हे काम पूर्ण करत आहे."
 
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "शेवटी रामललाचे मंदिर बांधले गेले. मी अयोध्येवर एक स्क्रिप्ट लिहिली आहे. यावर संशोधनही झाले आहे. हा भाग्याचा दिवस पाहण्यासाठी किती हिंदू…कारसेवकांनी आपले प्राण दिले. हा हिंदूंचा ६०० वर्षांचा संघर्ष आहे. मोदी सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे हा दिवस शक्य झाला आहे."
 
अभिनेत्री कंगना रणौत सध्या तेजस या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. तेजस हा चित्रपट भारतीय वायुसेनेवर आधारित असून रिलीजपूर्वी रामललाचे आशीर्वाद घेण्यासाठी कंगना रणौत अयोध्याला आल्या होत्या. या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहेत. त्याने भारतीय हवाई दलातील अधिकारी 'तेजस गिल'ची भूमिका साकारली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0