भारत टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपर,एक्सपोर्टर आणि लीडर म्हणून उदयास येत आहे : अश्विनी वैष्णव

27 Oct 2023 16:20:36

Ashwini Vaishnav
 
 
भारत टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपर,एक्सपोर्टर आणि लीडर म्हणून उदयास येत आहे : अश्विनी वैष्णव


नवी दिल्ली: भारत टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपर, एक्सपोर्टर आणि लीडर म्हणून उदयास येत आहे आणि आज जग देशाकडे आशेने पाहत आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले.
 
इंडिया मोबाइल काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्ट दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे दूरसंचार क्षेत्राने कनेक्टिव्हिटी,परवडणारी क्षमता आणि यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत आणि पूर्वीच्या खटले आणि टू जी घोटाळ्याच्या छायेतून हे क्षेत्र बाहेर पडले आहे.
 
इलेकॉम हे डिजिटलचे प्रवेशद्वार आहे, असे सांगून वैष्णव म्हणाले की, भारतात 5 जी सेवा वेगाने सुरू होणे आणि देशाचे स्पष्ट 6 जी व्हिजन आहे.
 
Powered By Sangraha 9.0