'एमपीएससी'अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात विविध पदांकरिता अर्जप्रक्रिया सुरू

27 Oct 2023 19:37:44
Department of Higher and Technical Education Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय, संस्थेतील विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

'एमपीएससी' अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण २१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०९ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

अर्जदारास अर्जशुल्क आकारण्यात येणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३९४ रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २९४ रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. एमपीएससीअंतर्गत होणाऱ्या भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0