पोर्तुगीजांनी गोव्यात हजारो मंदिरे पाडली - पुरातत्व विभागाचा अहवाल

26 Oct 2023 12:46:38
Goa 
 
पणजी : पोर्तुगीज राजवटीत गोव्यात १००० हून अधिक मंदिरे पाडण्यात आली होती. अशा मंदिरांची माहिती पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ समितीने गोळा केली आहे. अशी माहिती राज्याचे पुरातत्व मंत्री सुभाष पाल देसाई यांनी दिली आहे. या पाडलेल्या मंदिरांच्या जागी स्मारक बांधण्याची शिफारस समितीने सरकारला केली असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व मंदिरे पुन्हा बांधणे शक्य नाही, असे त्यांचे मत आहे.
 
पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेली मंदिरे ओळखण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी संभाव्य ठिकाणे ओळखण्यासाठी अर्ज आणि दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी या वर्षी जानेवारीमध्ये राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. यासाठी गोवा सरकारने २० कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती.
 
पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ समितीने १० पानांचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. यावरून गोव्यातील तिसवाडी, बारदेझ आणि सालसेट तालुक्यात सर्वाधिक मंदिरे पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे. विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “समितीचे काम या स्थळांची ओळख पटवणे आहे. समितीकडे आतापर्यंत १९ अर्ज आले आहेत. अनेक मंदिरे पाडण्यात आली. इतक्या मंदिरांची पुनर्बांधणी करणे शक्य किंवा व्यावहारिक नसल्याचे समितीला आढळून आले. भूसंपादन हेही आव्हान असेल. त्यामुळे सरकारने मंदिरांचे स्मारक बांधावे, अशी शिफारस समितीने केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0