टेलिकॉम, ब्रॉडकास्टिंग आणि आयटीमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी टीआरएचे पत्र.

26 Oct 2023 17:15:30

TRAI
 
टेलिकॉम, ब्रॉडकास्टिंग आणि आयटीमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी टीआरएचे पत्र
 
नवी दिल्ली: टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ' टेलिकॉम, ब्रॉडकास्टिंग आणि आयटीमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे ' या विषयावर एक सल्लामसलत पत्र २२ सप्टेंबर २०२३ ला प्रसिद्ध केले होते. भागधारकांकडून अभिप्राय प्राप्त करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आणि प्रति अभिप्राय 6 नोव्हेंबर 2023 निश्चित करण्यात आली होती.
 
प्राधिकरणाने अलीकडच्या काळात विविध विषयांवर अनेक सल्लापत्रे जारी केली आहेत आणि भागधारकांना अभिप्राय आणि प्रति अभिप्राय सादर करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून दिला आहे. हे लक्षात घेऊन प्राधिकरणाने अभिप्राय सादर करण्याची अंतिम तारीख २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आणि प्रति अभिप्राय ७ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Powered By Sangraha 9.0