देवीच्या जागरण कार्यक्रमात घुसून कट्टरपंथीयांनी दिल्या 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा

26 Oct 2023 13:15:49
 redical
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात देवी जागरण कार्यक्रमादरम्यान काही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. स्टेजवर भजन गात असलेल्या दोन व्यक्तींवर २ कट्टरपंथी मुलींनी काळे कपडे फेकले. त्यासोबतच गायकाचा माईक हिसकावून ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
 
हे प्रकरण बस्ती जिल्ह्यातील परशुरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत कट्टरपंथीयांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जागरण कार्यक्रम सुरु असताना रात्री अकराच्या सुमारास दोन मुस्लिम मुली स्टेजवर चढल्या. दोघांनी मातेच्या मूर्तीवर काळे कापड फेकून इस्लामसह पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
 
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, दोन्ही मुलींनी ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. या गोंधळात अरमान अली, अरबाज, मिराज, सुग्गन अली, शहाबुद्दीन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद झाकीरही स्टेजवर चढले. या सर्वांनी मिळून जागरणात उपस्थित लोकांना आव्हान देण्यास सुरुवात केली. या आरोपींसह अन्य काही लोकांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून हिंदूंना जीवे मारण्याच्या आणि दंगली घडवण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही केला आहे.
 
या सर्व ९ आरोपींना देशद्रोही ठरवून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मुस्लिम समाजातील ९ आरोपींविरुद्ध कलम १५३-बी आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0