कल्याण : "मेरी माटी माझा देश" अर्थातच "माझी माती माझा देश" या उपक्रमाच्या अंतिम टप्प्यात महापालिकेच्या १० प्रभागातून संकलित केलेल्या मातीचा अमृत कलश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिकेच्या स्वंयसेवकांकडे (महापालिका उपसचिव किशोर शेळके, वरिष्ट लिपिक मधुकर भोये) यांचेकडे गुरुवार दि. २६ रोजी सुपूर्द केला.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव उपस्थित होते. या उपक्रमासाठी महापालिकेचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी आणि स्वयंसेवक सदर अमृत कलश घेऊन गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रवाना झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून ठाणे जिल्हयातील अमृत कलश पथक हे शुक्रवारी सकाळी मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानात होणा-या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे . त्यानंतर सदर अमृत कलश पथक हे दिल्ली येथे "माझी माती माझा देश" या उपक्रमाअंतर्गत संपन्न होणा-या मुख्य सोहळयास उपस्थित राहणार आहे.