ऑक्टोबर हीटच्या झळांमुळे मुंबईकर त्रस्त

25 Oct 2023 14:52:14

october heat

मुंबई :
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्यापासून उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. यावर्षी ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवले होते. तरी, संपूर्ण ऑक्टोबरच्या सरतेशेवटी २१ तारखेला मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले होते. हे या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण विभागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसेच, मुंबईच्या हवेतून आर्द्रता कमी झाली असून शनिवारी दिवसभर मुंबईकर उन्हामुळे त्रस्त झाले होते. सामान्यत: समुद्री वारे दुपारी १ वाजेपर्यंत वाहण्याची शक्यता असते. मात्र शनिवारी उशीर झाल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.

हवामान विभागाने आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहिल. त्यामुळे पुढच्या आठवड्यातही किमान तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांना डोळे दुखणे/लाल होणे, डोकेदुखी, निर्जलीकरण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Powered By Sangraha 9.0