'अ‍ॅक्शन हिरो' रिचर्ड राउंडट्रीचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

25 Oct 2023 11:01:32

richard 
 
मुंबई : 'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' म्हणून जगभरात प्रसिद्ध असणारे लोकप्रिय अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे ग्रस्त होते. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अ‍ॅक्शन हिरो म्हणून रिचर्ड यांची ओळख होती.
 
'शाफ्ट' या १९७१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून रिचर्ड यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळाली होती. आफ्रिका आणि अमेरिकेच्या मनोरंजनसृष्टीत त्यांचा महत्वाचा वाटा होता रिचर्ड यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 
 
 
 
रिचर्ड राउंडट्री यांनी 'शाफ्ट इन आफ्रिका', 'स्टील', 'मूविंग ऑन', 'मॅन फ्रायडे', यासारख्या अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. रिचर्ड राउंडट्री वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीच सुपरस्टार झाले होते. पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मॉडलिंग पासून सुरु झालेला त्यांना प्रवास पुढे चित्रपट आणि नाटकापर्यंत पोहोचला.
Powered By Sangraha 9.0