"भावासोबत आणि वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेव. नाहीतर..." मुस्लीम महिलेने केली पतीविरुद्ध तक्रार

25 Oct 2023 14:56:05
 Moradabad-Triple-Talaq
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तिच्यावर पतीचा लहान भाऊ आणि मेव्हण्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. तिच्या सासरच्या मंडळींना तिला वेश्याव्यवसाय करायला लावायचे होते. असे आरोप पीडित महिलेने केले आहेत.
 
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. करुळा परिसरात राहणाऱ्या महिलेने पतीसह सासरच्या इतर सदस्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे फेब्रुवारी २०२२ मध्ये संभल येथील एका तरुणाशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पीडितेचा पती, सासू, सासरे यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. सासरे आणि पतीचे मेव्हणे तिच्यावर वाईट नजर ठेवत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने हा प्रकार तिच्या सासूला सांगितला तेव्हा तिने तिला गप्प राहण्याची धमकी दिली.
दरम्यान, महिलेच्या पतीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले. असे दाखवून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. अत्याचारामुळे तिने वेळेपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ३० ऑगस्ट २०२३ रोजी सासरच्यांनी तिला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.
 
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, घरातून हाकलून दिल्यानंतर ती तिच्या माहेरच्या घरी राहू लागली. १० सप्टेंबर २०२३ रोजी तिचा नवरा तिच्या सासरच्या काही सदस्यांसह आला. त्यांना जबरदस्तीने सोबत घेऊन जायचे होते. तिने विरोध केला असता पतीने तिचा स्कार्फने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तीला तिहेरी तलाक दिला.
 
 
Powered By Sangraha 9.0