पालघर साधू हत्याकांड हा फक्त अपघात, ठाकरेंच्या बदनामीसाठी षडयंत्र : राऊत

25 Oct 2023 17:32:38
 
Raut
 
 
मुंबई : दसरा मेळाव्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालघर साधू हत्याकांड हा फक्त एक अपघात होता. हा अपघात उद्धव ठाकरेंच्या बदनामीसाठी षडयंत्र रचण्यात आलं, असा अजब तर्क खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
राऊत म्हणाले, "पालघर साधू हत्याकांड हा फक्त अपघात होता. उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा कट रचला होता. मराठा आरक्षण द्यावंच लागेल. उपकार करताय का? नाहीतर महाराष्ट्रात आग लागेल. तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तुम्ही कुणाच्या मेहेरबानीनं मुख्यमंत्री झालात, का झालात हे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत तुम्हाला तिथे बसवलंय, तोपर्यंत तुम्हाला हे काम करावंच लागेल. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा अशी सभा घेऊन दाखवा. आम्हाला न्यायालयाचाही निर्णय नकोय. गरज नाही आम्हाला त्याची. जनतेच्या न्यायालयात चला. निवडणूक घ्या. तिथे ठरेल कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी ते.” असं राऊतांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0