राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत अॅप्रेंटिस म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी

25 Oct 2023 15:11:55
Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Apprenticeship

मुंबई :
'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड', मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार, ट्रेड शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड'अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे एकूण ४०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, यासाठी अर्जदारास अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. भरतीसाठी आवश्यक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0