कितीदा नव्याने... केशव उपाध्येंची ठाकरेंवर काव्यात्मक टीका

25 Oct 2023 16:37:10
 
Keshav Upadhyay tweet
 
 
मुंबई : कितीदा नव्याने खोटे बोलावे, एकच रडगाणे सारखे ऐकवावे. अशी काव्यात्मक टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. दसरा मेळाव्यात ठाकरेंनी केलेल्या भाषणावर केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. किती गुंडाळावे वडिलांच्या पुण्याईला, किती दाखवावे खोट्या हिंदुत्वाला. असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
 
 
ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, "(उध्दव ठाकरेंसाठी) कितीदा नव्याने खोटे बोलावे एकच रडगाणे सारखे ऐकवावे… किती ही लाचारी त्या खुर्चीसाठी, कितीदा वाकावे काँग्रेससाठी, कितीदा स्वतःचे हसे करून घ्यावे… किती गुंडाळावे वडिलांच्या पुण्याईला, किती दाखवावे खोट्या हिंदुत्वाला, कितीदा रडुनी हसे करून घ्यावे… कितीदा नव्याने खोटे बोलावे..." अशी काव्यात्मक टीका केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0