दुर्गा मातेवर असभ्य टिप्पणी करणाऱ्या पत्रकाराला लोकांनी दिला चोप

25 Oct 2023 14:10:58
kashi 
 
लखनऊ : दुर्गा मातेवर असभ्य टिप्पणी करणाऱ्या पत्रकार अमित मौर्यला लोकांनी चांगलाच चोप दिला आहे. वाराणसीच्या शिवपूर येथील रहिवासी अमित मौर्य हा एक पत्रकार आहे. दुर्गा मातेबद्दल अत्यंत अशोभनीय टिप्पणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये टिप्पणी करणारा अमित मौर्य असल्याचे उघड झाल्यानंतर लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
 
यानंतर लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अमित मौर्यवर एफआयआर दाखल करण्यात आली. वाराणसीच्या शिवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0