अभिनेता राजकुमार रावची निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती

25 Oct 2023 14:03:58

rajkumar and pm
 
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी ही अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात येईल. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांआधी अभिनेता राजकुमार राव याची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. यावेळी भारतीय निवडणूक आयोगातर्फे राजकुमार राववर खास जबाबदारी देखील सोपवण्यात येणार आहे.
भारतातील पाच राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणुक पार पडणार आहे. आता विधानसभा निवडणुकीत मदतान करण्याचं आवाहन करताना राजकूमार राव देखील दिसणार आहे. राजकूमार ज्या पद्धतीने त्याची प्रत्येक भूमिका उत्कृष्ट साकारतो तशीच ही जबाबदारी देखील बजावेल अशी आशा केली जात आहे.
 
 
दरम्यान, नॅशनल आयकॉन हे मतदारांना अधिक जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त नागरिक मतदानाचा हक्क बजावतात. या आधी निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची निवड नॅशनल आयकॉन म्हणून केली होती.
Powered By Sangraha 9.0