बाबरसेनेची सेमीफायनलची वाट खडतर; 'या' संघांचे असणार आव्हान!

24 Oct 2023 16:33:17
pakistans-qualification-scenario-for-cricket-world-cup-2023

मुंबई :
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषकातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या लढतीत अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ विकेट्सने मात करत ऐतिहासिक विजय मिळविला. त्यामुळे पाकिस्तानने ५ सामन्यात फक्त २ सामने जिंकले. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह ५ व्या स्थानावर आहे.

दरम्यान, क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या सेमीफायनलसाठी कसा पात्र ठरण्यावर आता शंका उपस्थित होऊ लागला. आगामी चार सामन्यात पाक संघाला प्रत्येक सांमन्यात विजय मिळविले गरजेचे असणार आहे. कप्तान बाबर आझमचा विश्वचषकातील परफॉर्मंन्स पाहता, संघाची पुढची वाटचाल आव्हानात्मक असणार आहे. तसेच, पाकिस्तानच्या उर्वरित सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या लढतींचा समावेश आहे. हे सामने महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे निकाल पाकिस्तानची सेमीफायनलपर्यंतची वाट निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावतील.

पाकिस्तान संघासमोर पुढील आव्हानं कोणती, कसे असेल समीकरण?

बाबरसेनेला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना १२ गुण मिळतील, तथापि, पुढील समीकरणं जुळविण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाच्या निकालांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, आगामी सामन्यात एक जरी पराभव झाला तर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग गुंतागुंतीचा करू शकतो. विशेषत: न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बाबरसेनेचा सामना होणार आहे.

हे असतील पाकिस्तान संघाचे पुढील सामने

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ऑक्टोबर २७): एक निर्णायक सामना जो या स्पर्धेत पाकिस्तानचे भविष्य निश्चित करू शकेल.

न्यूझीलंड विरुध्द पाकिस्तान (०४ नोव्हेंबर) यांच्यात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होईल.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (११ नोव्हेंबर): दोन्ही संघ उपांत्य फेरीतील स्थानासाठी लढत असल्यामुळे एक सामना जिंकणे आवश्यक आहे.

Powered By Sangraha 9.0