रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात; घरातुन निघताना झाले भावुक

24 Oct 2023 14:59:13
 
Rohit Pawar
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला २४ ऑक्टो. पासुन सुरूवात झाली. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु होत आहे. घरातून निघताना रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आई-बाबा आणि सासू-सासरे यांचा आशीर्वाद घेऊन राज्यातील तमाम युवांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघाल्याचं रोहित पवार म्हणाले.
 
 
 
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली असून ही यात्रा टिळक स्मारकाजवळ पोहोचली आहे. टिळक स्मारक मंदिराच्या बाहेर शरद पवार आणि रोहित पवारांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. पुण्यातील टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0