रेल्वे बोर्डाकडून दसऱ्यानिमित्त कर्मचाऱ्यांना मोठी भेट!

24 Oct 2023 13:23:43

Indian Railway


मुंबई :
रेल्वे बोर्डाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट असल्याचे मानले जात आहे.
 
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के इतका वाढवला आहे. हा बदल १ जुलै २०२३ पासून लागू केला जाईल. रेल्वे कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात थकबाकी आणि नवीन डीएसह पगार मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ७८ दिवसांच्या कामगिरीशी निगडीत बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे.



Powered By Sangraha 9.0