जाणून घ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर!

24 Oct 2023 12:45:38

Gold Prize


मुंबई :
सण-उत्सवांची सुरुवात झाली असून बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे. आज विजयादशमी असून यादिवशी सोनं खरेदी करण्याचा मान आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. आजचे मुंबईतील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
 
२४ कॅरेट सोनं म्हणजे सर्वात शुद्ध सोनं असते. मुंबईत सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ६१,६९० रुपये एवढे आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे भाव ५६,५५० रुपये एवढे आहेत. तसेच चांदीचे दर ७४,६०० रुपये प्रति किलो एवढे आहेत.


Powered By Sangraha 9.0