इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने बाबरसेनेची उडविली खिल्ली!

24 Oct 2023 17:02:05
Former England Captain Michael Vaughan on PAK

मुंबई :
अफगाणिस्तानविरुध्द सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे बाबरसेनेला टीकेला सामोरे जावे लागले. चेन्नई येथे झालेल्या विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तान संघाचा अफगाणिस्तान संघाने ८ विकेट्सने राखून धुव्वा उडविला. या विजयासह अफगाणिस्तान संघाने ऐतिहासिक क्षण साजरा केलाय.


दरम्यान, या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने 'X' वर पोस्ट करत बाबरसेनेला टोला लगावला आहे. पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव पाहता, स्टेडियमवर दिल दिल पाकिस्तान हे गाणे लावलेच नाही, अशा शब्दांत टोला लगावला. यापराभवामुळे सोशल मीडियावर बाबरसेनेवर टीकेची झोड उठविण्यात आली.

तसेच, १४ ऑक्टोबरला झालेल्या भारत विरुध्द पाकिस्तान या सामन्यात हे गाणे ऐकूच न आल्याने पाकिस्तानी संघाचे संचालक मिकी ऑर्थर यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी त्यांनी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती.
Powered By Sangraha 9.0