मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असताना आता सांगली जिल्ह्यातील बिरुदेव खर्जे या तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. जत तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडी येथे बिरुदेव खर्जे राहत होता. शेतातल्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या पॅंटच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये आपण धनगर आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवित असून याबद्दल नातेवाईकांना त्रास देऊ नये. असं लिहिलं आहे.
बिरुदेव खर्जेच्या अंत्यविधीला आमदाप गोपीचंद पडळकर उपस्थित राहिले. यावेळी बिरुदेव खर्जे परिवाराची जबाबदारी स्वीकारत असल्याचं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं. या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.