महिलांची स्वारी पुन्हा जाणार ट्रीपला, 'झिम्मा २' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

23 Oct 2023 17:30:45

zimma 2
 
 
मुंबई : संपुर्ण स्त्री प्रेक्षकांचा आवडता चित्रपट ‘झिम्मा’ सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली होती. झिम्मा या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार अशी प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. ती उत्सुकता संपली असून दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला ‘झिम्मा २’ येणार असून पुन्हा एकदा स्त्रीयांची ट्रीम नव्या ठिकाणी जाणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टिझर हा नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
या टीझरची सुरुवात पिकनिकचे प्लॅनिंग करण्यापासून होते. यावेळी सिद्धार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्व स्त्रियांना मेसेज करतो. “बायांनो, पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या. कारण आहे इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस. जो तिला आपल्याबरोबर साजरा करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे”, असे सांगतो. त्यानंतर तो उठून जातो आणि काय हौस आहे मला असे पुटपुटतो. यानंतर त्याच्या फोनवर पटापट मेसेज येण्यास सुरुवात होते आणि त्याचा फोनची रिंगटोन सतत वाजत असते, असे या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आता इंदू डार्लिंग च्या ७५ व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
 
‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजेच ‘झिम्मा’त सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. आता या चित्रपटात त्याच अभिनेत्री असणार की संपुर्ण नवी फळी येणार की त्याच मैत्रिणींसोबत अजून मैत्रिणी येणार हे मात्र लवकरच समजणार आहे.
Powered By Sangraha 9.0