कांदिवलीत लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यु

23 Oct 2023 18:25:16

fire

मुंबई :
मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन सेवेने वीणा संतूर इमारतीकडे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
 
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांचे आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आत अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. तरी या आगीत दोघांचा मृत्यु तर तीनजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीच्या दोन मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर आग लागली असल्यामुळे घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट दिसत होते. ही आग केवळ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशनपर्यंतच होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Powered By Sangraha 9.0