मुंबई : मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या दोन मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर आग लागली असल्यामुळे घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट दिसत होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांचे आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आत अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तरी आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच कोणत्याच प्रकारच्या नुकसाना बद्दल माहिती अद्याप मिळाली नाहि.